Sunday, October 7, 2007

एक जग असेल असंही ..वसंत बहरला असेल जिथे माझ्या प्रेमाचा,कायमचा, कधीच न जाण्यासाठी..एक क्षण असेल असाही..झाली असशील तू माझी राणी,ह्रुदयाची, कधीच न विलगण्यासाठी..एक नशा असेल अशीही..नाचत असेल माझ्या मनाचा मोर आनंदाने,बेधुंद तुझ्या प्रेमात, कधीच न थांबण्यासाठी..एक दिवस असेल असाही..ओठावर भिजेल तुझ्या, माझेच प्रेमगीत,लक्षात राहील ते तुझ्या, कधीच न विसरण्यासाठी..एक रात्र असेल अशीही..कौमुदीच्या प्रकाशात उजळेल, रूप तुझे सोज्वळ,पाहात राहीन तुला, कधीही न त्रुप्त होण्यासाठी...
मी युगायुगांचा तृषार्त तुझा, उन्हात मी उभा..धरणी मनाची करपली आता भेगाही पडल्या,वर्षा होउन या ह्रुदयावर ,बेधुंद एकदा बरसशील का?सखे आज तरी येशील का?उमगली ना तुला, माझी वेडी प्रीत कधीही,दु:ख तेच, वेड तेच, स्वप्न तसेच आजही,काय होते स्वप्न माझे, एकदा, जगशील का?सखे आज तरी येशील का?ना वर्षांची अट घालतो, महिन्याची ना दिवसाची,सन्ध्याकाळ एक फ़क्त हवी, मनीचे वद्ण्या सर्व तुला,आयुश्यातली ’एकच’ संध्या, प्रेमभराने देशील का?सखे आज तरी येशील का?रिक्त आरश्यात मी पाहता, प्रतिबिंब तुझेच मी पहावे,प्रेम नसे तर, काय असे हे मला कधी न कळले,या सगळ्याचा अर्थ मजला एकदा समजून सांगशील का?सखे आज तरी येशील का?बाहू आता थरथरले अन पाय देखील लटपटले,डोळे पुन्हा भरून आले, ओझे पेलवे ना जगण्याचे,चार पावले शेवटची ही, संगे माझ्या चालशील का?सखे आज तरी येशील का?
पहाटेच्या अर्धवट झोपेतल्या स्वप्नात तू यावीस, अनसोनेरी दिवसाचं रुपडं पाहून, तुझ्यावरच कविता सुचावी,ओळी त्याच गुणगुणत, स्वत:वरच खूश होणं किती सोपं आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..घराबाहेर पडून वाटावं की आजचा दिवस काही खास आहे, अनचालता चालता पायांनीही नकळत, तुझ्याच घराकड्ची वाट धरावी,पाय माघारी वळले तरी,मनानेच तिथं रेंगाळत राहणं किती सोप आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..घरी परतताना मित्रासारखा, पाउस वाटेत साथ द्यायला यावा, अनत्याच पावसाला चुकवत चुकवत जाणारी, तूच वाटेत दिसावी,’तुला चोरून स्पर्शणारा तो थेंब मीच’, अशी कल्पना करणं किती सोप आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..पाउस थांबल्यानंतरची शांतता ऐकून,मनानेही तसंच शांत व्हावं, अनएक क्षण असा यावा की, मी स्वत:लाही विसरून जावं,माझ्यातून मला वजा करूनही तूच उरावीस, हे गणित कळणं किती सोपं आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..खरचं प्रिये,पुन्हा तुझ्या प्रेमात पड्णं किती सोप आहे...