Sunday, October 7, 2007

पहाटेच्या अर्धवट झोपेतल्या स्वप्नात तू यावीस, अनसोनेरी दिवसाचं रुपडं पाहून, तुझ्यावरच कविता सुचावी,ओळी त्याच गुणगुणत, स्वत:वरच खूश होणं किती सोपं आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..घराबाहेर पडून वाटावं की आजचा दिवस काही खास आहे, अनचालता चालता पायांनीही नकळत, तुझ्याच घराकड्ची वाट धरावी,पाय माघारी वळले तरी,मनानेच तिथं रेंगाळत राहणं किती सोप आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..घरी परतताना मित्रासारखा, पाउस वाटेत साथ द्यायला यावा, अनत्याच पावसाला चुकवत चुकवत जाणारी, तूच वाटेत दिसावी,’तुला चोरून स्पर्शणारा तो थेंब मीच’, अशी कल्पना करणं किती सोप आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..पाउस थांबल्यानंतरची शांतता ऐकून,मनानेही तसंच शांत व्हावं, अनएक क्षण असा यावा की, मी स्वत:लाही विसरून जावं,माझ्यातून मला वजा करूनही तूच उरावीस, हे गणित कळणं किती सोपं आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..खरचं प्रिये,पुन्हा तुझ्या प्रेमात पड्णं किती सोप आहे...

No comments: